सौम्या शर्मा-अर्चित चंदन प्रशासकिय सेवेतील ग्लॅमरस व प्रेरणादायी जोडपे

सोशल मिडियावर बहुचर्चित

-प्रचंड मोठी फॅन फॉलोईंग
अमरावती / 17 जून: आयएएस सौम्या शर्मा यांची आज अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती शहरात सौम्या शर्मा यांची पहिल्यांदाच अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असली तरी आयपीएस अधिकारी असलेले त्यांचे पती चंदन अर्चित यांच्या साथीने त्यांची जी सोशल मिडियावरील सक्रियता आहे, त्यामुळे त्या आजच्या पिढीला चांगल्याच परिचित आहेत. समाज माध्यमांवर या जोडप्याचा मागोवा घेतला तर ते एखाद्या बॉलीवूड स्टारपेक्षा ग्लॅमरच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत, असेच दिसून येते. समाजाकडे बघण्याचा या जोडप्याचा विशिष्ट दृष्टीेकोन युवकांना चांगलाच भावतो. त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग आहे. प्रशासकिय अधिकारी असलेल्या नवरा-बायकोची ही जोडी एक प्रेरणादायी जोडपे म्हणून ओळखले जाते. अर्चित चंदन हे सध्या अकोला येथे जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी होते.
सौम्या शर्मा 2018 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. तर अर्चित चंदन 2018 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सौम्या शर्मा यांनी 2017 मध्ये पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना 9 वी रँक मिळाली होती. सौम्या यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्या जन्मतःच कर्णबधिर आहेत आणि त्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून यश मिळवले आहे. सौम्या शर्मा या सध्या महाराष्ट्र केडरमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत. तर अर्चित चंदन हे 2018 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. 35 लाख रुपयांची नोकरी सोडून त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. सौम्या आणि अर्चित यांचे लग्न लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मध्ये झाले, जिथे त्यांचे प्रशिक्षण झाले होते.
सौम्या आणि अर्चित यांची जोडी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांचे चाहते त्यांना खूप पसंत करतात. सौम्या शर्मांच्या इन्टाग्राम अकाउंटवर अडिच लाख फॉलोवर्स आहेत. तर अर्चित चंदन यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला 1 लाख 6 हजार लोक फॉलो करतात. जेव्हा हे जोडपे समाज माध्यमावर काही पोस्ट करतात तर त्याला लाखो व्ह्युज मिळतात. कुणालाही हे वाचून आश्चर्य वाटेल की केवळ चार महिन्यांच्या तयारीतच सौम्या शर्मा यांनी आयपीएस परिक्षेत यश प्राप्त केले आहे. एवढेच नाही तर युपीएससी परिक्षेत 9 वी रँक मिळवून टॉपर लिस्टमध्येही आपले नाव नोंदविले होते. अमरावती शहरात सौम्या शर्मा आणि अर्चित चंदन यांना फॉलो करणार्‍यांची संख्या मोठी आहे, हे त्यांच्या मित्र यादीतून दिसून येते. समाज माध्यमासोबतच शहरात मनपा आयुक्त म्हणून प्रत्यक्ष काम करताना त्या आपल्या कर्तुत्वाची प्रभावी छाप सोडतील, याबाबत त्यांच्या चाहत्यांना खात्री आहे.

संबंधित बातम्या

Back to top button