संजय अग्रवाल यांची निवडणूक लढवण्याची तयारी

भाजपच्या बंडखोर कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरू

अमरावती /31 डिसेंबर – भारतीय जनता पक्षाचे मनपासह माजी गटनेते म्हणून ओळख असलेले संजय अग्रवाल अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. याबाबत त्यांनी मित्र आणि कार्यकर्त्यांशी चर्चा सुरु केली आहे. अशी माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करतांना दिली. त्यांनी प्रभाग क्रमांक 7, जवाहर स्टेडियममधून भाजपचे उमेदवार आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी भाजपच्या तिकिटासाठी अर्ज केला होता. पक्षाने त्यांना तिकीट दिले नसल्यामुळे, ते आता मित्र आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. संजय अग्रवाल हे भाजपमधील राजस्थानी समुदायाचे एक प्रमुख चेहरा आहेत. अनेक वेळा नगरपालिका निवडणुका जिंकणारे अग्रवाल यांनी जवाहर स्टेडियम येथुन खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज पडताळला असुन सध्या अर्ज कायम आहे. मित्र आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन अंतीम निर्णय लवकरच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता – विनोद गुहे

माजी खा.नवनीत राणा यांच्यासोबत भारतीय जनता पक्षात सामील झालेले तरुण कार्यकर्ते विनोद गुहे यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी निवडणूक लढणार नाही. पार्टीकडे त्यांनी तिकिटासाठी अर्ज केला होता, परंतु भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. तरीही एक निष्ठावंत भाजप कार्यकर्ता असल्याने पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी परिश्रम घेईल असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button