मनपात संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

अमरावती /8 डिसेंबर : संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, मनोज शहाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, अभिलेखागार नंदकिशोर पवार, महानगरपालिका संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.




