भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमाची आढावा बैठक

सामाजिक संघटना, माजी सैनिक, समता सैनिक दलाचा मोठा सहभाग

अमरावती /15 डिसेंबर : 1, 2 व 3 जानेवारी 2026 रोजी सायन्स कोर मैदान, अमरावती येथे होणार्‍या विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या भीमाकोरेगाव मानवंदना कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रविवारी अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस विविध सामाजिक संघटना, माजी सैनिक, समता सैनिक दलाचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. मागील 14 वर्षांपासून अमरावती येथे सातत्याने भीमाकोरेगाव मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, यंदाही हा कार्यक्रम भव्य व ऐतिहासिक स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीत कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात नवीन प्रस्ताव सादर करण्यात आले. तसेच मागील 14 वर्षांत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणार्‍या प्रतिनिधी, माजी सैनिक संघटना व समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह 2 जानेवारी रोजी सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी स्वतंत्र समिती गठित करून यादी तयार करण्यात आली आहे. यावेळी समाजभूषण पुरस्कार वितरण समिती स्थापन करण्यात आली असून समाजभूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम अधिक व्यापक व प्रभावी करण्यासाठी 25 नवीन प्रतिनिधींना आयोजन समितीत समाविष्ट करून विविध जबाबदार्‍या वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीत तीन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी दि.1 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता समता सैनिक दल व माजी सैनिकांच्या वतीने मानवंदना देण्यात येणार असून, सायंकाळी 6 वाजता सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात, अभिजीत राजे, राहुल शिंदे व विपिन तातड यांचा संगीत मैफलीचा कार्यक्रम होणार आहे.दुसर्‍या दिवशीदि.2 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा, तर सायंकाळी 6 वाजता आधुनिक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक विचारमंथन व गायक अजय देहाडे यांचा ‘भीमा कोरेगाव’ संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तर 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.आयोजन समितीचे प्रवेश पास तयार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजक कैलास मोरे यांनी केले. बैठकीचे प्रास्ताविक धनंजय गुळदेकर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश अंभोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बबिता डोंगरदिवे यांनी मानले. या बैठकीस कैलास मोरे, रमेश कटके, धनंजय गुळदेकर, कपिल धवणे, मनीष गुडदे, सुमित कांबळे,मंगेश तायडे, व्ही. एम. वानखडे, कृष्णराव वानखडे, भानुदास वानखडे, सिद्धार्थ चोरपगार, किशोर सरदार, देवेंद्र रामटेके, सफीभाई सौदागर, यशवंत बादशाह, प्रशांत तायडे,रमेश कटके ,धनंजय गुडदेकर , सफीभाई सौदागर ,किशोर सरदार,गौतम वानखडे, प्रेमचंद इंगळे शांतरक्षक गवई , सुमेध कांबळे,प्रवीण आठवले , प्रकाश खरुले, अँड.प्रभाकर वानखडे,उदयभान गजभिये, संजय बनसोड, रुपेश भिवगडे, संजयभाऊ गडलिंग,राजकुमार वरघट ,बंडूभाऊ चोटपगार, सचिन मुन , पंकज धर्माजी वंजारी, देवेंद्र रामटेके,मंदाताई गवई ,बबीताताई डोंगरदिवे ,सुवर्णाताई गावंडे ,वंदनाताई चव्हाण, माधुरीताई डोंगरे ,मंगलाताई डोंगरे, सविता आमटे ,प्रतिभा गेडाम, उषा लांडगे ,अनुराधा वरघट,कल्पना बनकर ,आरती ठाकूर ,ममता किर्तकार,माधुरी इंगळे, अर्चना जवंजाळ ,चंदा मकेश्वर ,छाया गाडेकर, प्रतिभा वानखडे ,बबीता ताई तायडे ,नंदा वानखडे ,तृप्ती वानखडे, तेजू ठाकूर, रिया वरघट, रुचिका दामोधरे ,यांच्यासह असंख्य महिला-पुरुष प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button