सेवानिवृत्त प्राध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

तिवसा /14 नोव्हेंबर : तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयातील 70, वर्षीय, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.एकनाथ मोहोड, यांनी चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या माधाण येथे एका शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि.14, रोजी पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
डॉ. एकनाथ मोहोड, असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव असून ते गुरुवार दि13,नोव्हेंबर, पासून गुरुदेव नगर, गुरुकुंज येथून चादूर बाजार तालुक्यात असलेल्या माधाण येथे शेतात कामानिमित्त गेले होते.परंतु रात्र उलटूनही उशीरापर्यंत घरी परत न आल्याने कुटूंबियांनी त्यांचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला. अखेर आज पहाटेच्या दरम्यान त्यांचा मृतदेह माधान येथील शेतात असलेल्या विहिरीत आढळून आला. या घटनेने गुरुकुंज मोझरी परिसरात सर्वत्र एकच खबळ उडाली आहे. सण 2009, मध्ये ते श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयातुन सेवानिवृत्त होऊन, सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक यांनी एकाकी आत्महत्या का?केली असावी याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्यांच्या आत्महत्येने गुरुदेवनगर गुरुकुंजात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button