रमेश धुमाळ अमरावतीचे नवे पोलिस उपायुक्त
किरिथिका सी.एम. यांची नाशिकला बदली

अमरावती / 9 जुलै: महाराष्ट्र पोलिस खात्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी रमेश धुमाळ यांची अमरावतीचे नवीन पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते लवकरच शहरात दाखल होवून आपला पदभार स्विकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच अमरावती पोलिस आयुक्तालयात उपायुक्तपदी बदलून आलेले किरिथिका सी. एम. यांची नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. रमेश धुमाळ हे नागपूर ग्रामीण पोलिस विभागात उपायुक्त पदावर कार्यरत होते. आता ते अमरावतीच्या उपायुक्तपदावर सेवा देणार आहेत.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिस दलात गृह मंत्रालयाने मोठे फेरबदल केले होते. अमरावती पोलिस आयुक्तालयातूनही दोन उपायुक्तांचे इतरत्र स्थानांतरण करण्यात आले होते. किरिथिका सी. एम. यांची अमरावतीला उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली. तरीही एक पद रिक्त होते. आता आज गृह मंत्रालयाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात रमेश धुमाळ यांना अमरावतीच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.




