जिल्हा जैन प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी राजेंद्र बन्नोरे यांची नियुक्ती

नव्या पदाधिकार्‍यांचे भाजप नेत्यांकडून अभिनंदन

अमरावती /9 नोव्हेंबर – भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला आणि सर्व स्तरांवर लोक प्रतिनिधित्व असलेला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी अनेक मोर्चे, आघाड्या, सेल व प्रकोष्ठ स्थापन करण्यात आले आहेत. या परंपरेनुसार भाजप अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा जैन प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी राजेंद्र केशरीचंद बन्नोरे यांची नियुक्ती केली असून, त्यांनी आज आपल्या कार्य कारिणीची औपचारिक घोषणा केली. कार्यकारिणी जाहीर करताना राजेंद्र बन्नोरे यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करून त्यांचे आदर्श स्मरले. त्यांनी सांगितले की, भाजप हा केवळ पक्ष नसून एक विचारप्रवाह आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने कार्य करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. बन्नोरे यांनी पुढे सांगितले की, पक्षाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रेरणेतून आणि भाजप अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी डॉ. नितीन धांडे तसेच राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार सौ. नवनीत राणा, माजी अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील, प्रदेश सचिव जयंत डेहनकर, किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, प्रा. रविंद्र खांडेकर, सौ. किरण महल्ले, सरचिटणीस बादल कुलकर्णी, ललित समदुरकर, सौ. राधा कुरील आणि इतर नेत्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. सर्व वरिष्ठ नेत्यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नव्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी राजेंद्र केशरीचंद बन्नोरे, उपाध्यक्षपदी गौरव चोपडा, आदेश आलसेट, कुशल दर्यापुरकर आणि नीलेश कळमकर, सरचिटणीसपदी सचिन जैन, सचिवपदी कुशल काळे, सहसचिवपदी प्रवीण बन्नोरे व विमलेश छाजेड, कोषाध्यक्षपदी रोहन देवलसी, प्रचार प्रमुखपदी सजल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून शुभम शाह, महावीर कटारिया, हर्षल फुरसुले, रूपेश लोढा आणि चयन किशोर लोढा यांचा समावेश आहे. या प्रसंगी सर्व नव्या पदाधिकार्‍यांनी संघटनेच्या विस्तारासाठी, समाजसेवेच्या माध्यमातून जैन समाजासह सर्व घटकांमध्ये पक्षाच्या धोरणांचा प्रचार करण्याचा संकल्प केला. भाजप अमरावती शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नव्या कार्यकारिणीचे स्वागत करून त्यांना त्यांच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button