नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 50 हजार रुपये मदत द्या

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

 * विविध संघटनांचे कार्यकर्ते जिल्हाकचेरीवर धडकले

अमरावती /3 ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी विविध पक्ष आणि संघटनांचे निदर्शने सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर युवा लायन्स सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन शेतकर्‍यांच्या समस्येकडे लक्ष वेधले आणि शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. सरकारने जाहीर केलेल्या 2215 कोटी रुपयांवर रोष व्यक्त करून अपूर्ण निधीवर टीका करण्यात आली. आंदोलनामध्ये अमित निकाळजे, नितेश गुडधे, हंसराज गजभिये, सतिश तायडे, सिचन सिरसाठ, धीरज ठाकुर, अ. शारीक, प्रतिक हिवराळे, प्रफुल्ल कोकाटे, आकाश पारवे, रोहित लकडे, पंकज वानखडे, शुभम सिरसाट, राजा सूर्यवंशी आदींनी सहभाग घेतला. त्यांनी राज्य सरकारने पंजाब सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही प्रति एकर 50,000 रुपये मदत करावी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. आंदोलनानंतर योगेश गुढे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले.

संबंधित बातम्या

Back to top button