शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव मंजूर

भेटवस्तू वाटपाची परंपरा कायम

* जिल्हा बँकेच्या सत्ताधारी पक्षाचा दावा

अमरावती /23 सप्टेंबर : जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. बँकेच्या सभासदांना भेटवस्तू देण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे अध्यक्ष बच्चू कडू व उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांच्यासह सात संचालकांनी या प्रस्तावाला मान्यता दिली, मात्र विरोधी गटातील 11 संचालकांनी प्रस्तावाला विरोध दर्शविला. असे स्पष्टीकरण जिल्हा बँकेच्या सत्ताधारी पक्षाने दिले आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेच्या पदाधिकार्‍यांनी वरील मुद्द्यावर माहिती देताना सांगितले की, सभासदांना भेटवस्तू देणे ही परंपरा खूप जुनी आहे. सध्याचे विरोधी पक्षनेते सत्तेत असताना त्यांनी अशा प्रकारे भेटवस्तू दिल्या होत्या. सत्ताधारी पक्षास प्रसारमाध्यमांनी छेडले असता त्यांनी सांगितले की, नाबार्डच्या ऑडिटवर कोणताही आक्षेप नाही. सत्ताधारी पक्षाने स्पष्ट केले की, किरकोळ विक्रेत्यांकडून भेटवस्तू कमीत कमी किमतीत खरेदी केल्या जातात. विरोधी पक्षाच्या काळातही ही पद्धत अवलंबली जात होती. त्याचप्रमाणे, गेल्या दोन वर्षांतील नाबार्डच्या ऑडिटमध्ये भेटवस्तू वितरणावर कोणताही आक्षेप आढळला नाही. उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी विरोधी पक्षाच्या कोटेशन न मागण्याच्या आरोपाचे खंडन केले. अभिजित ढेपे यांनी सांगितले की, बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत, त्यामुळे बँकेच्या कारभारावर असे आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. बैठकीत शेतकरी कर्जमाफीची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावावर संचालक ए.एस. देशमुख, वीरेंद्र जगताप, एस.एन. भारसाकळे, एस.बी.साबळे, बी.बी. वानखडे, डी.एस. काळे, एस.बी. गावंडे, पी.बी. अलोने, आर.व्ही. गायगोले आणि एम.एस. वानखडे मार्डीकर यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button