सॅटेलाईट सर्व्हेद्वारे घरांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे वचन

* पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जनसभेतून ग्वाही

अमरावती / 10 जानेवारी : शहराच्या महानगरपालिकेवर भाजपचा भगवा पुन्हा एकदा फडकवण्याचे आवाहन करत, आगामी पाच वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा निर्धार जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी व्यक्त केला आहे. अमरावतीत सॅटेलाईट सर्व्हे करून प्रत्येक घराचे प्रॉपर्टी कार्ड बनवले जाईल. या सर्वेक्षणाचा प्रति घर 4 हजार रुपयांचा खर्च सरकार स्वतः उचलणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली.
चपरासीपुरा येथे आयोजित भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जनसभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार संजय कुटे, आमदार प्रताप अडसड, आमदार सुलभा खोडके, शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते. बावनकुले पुढे म्हणाले की, ड्रोन कॅमेर्‍याद्वारे संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करून मालमत्तेचे अचूक मोजमाप केले जाईल आणि नागरिकांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल. तसेच नजूलच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या गरीबांना ’प्रधानमंत्री आवास योजने’तून हक्काची घरे बांधून दिली जातील. ’पीएम सूर्यघर’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आगामी काळात सर्वसामान्यांचे वीज बिल शून्य होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. अमरावती विमानतळावरून या वर्षापासूनच 10 प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू होईल, तसेच लवकरच ’नाईट लँडिंग’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. शहराच्या सुरक्षेसाठी 1टर कोटी रुपये खर्चाचा सीसीटीव्ही सर्व्हिलन्स प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आयटी पार्क आणि पीएम मित्र टेक्सटाईल पार्कमध्ये मोठ्या उद्योगांना पाचारण करून स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले. सभेत उपस्थित महिला वर्गाला संबोधित करताना त्यांनी ’लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख केला. तसेच, आता महिला बचत गटांसाठी नवीन योजना आणली असून, 10 महिलांच्या प्रत्येक गटाला 1 लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आजोळच्या अमरावती शहराला दत्तक घेतले असून, विकासकामांची

संबंधित बातम्या

Back to top button