प्रा.योगेश रोचलानी यांना आचार्य पदवी

अमरावती /4 डिसेंबर : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारा संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. योगेश रामचंद्र रोचलानी यांना नुकतेच आचार्य पदवी ने सन्मानित करण्यात आले. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या प्रमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या, संशोधनाच्या मार्गदर्शक डॉ. अंजली राऊत यांच्या मार्गदशनाखाली प्रा. रोचलानी यांनी डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ अ क्लासिायर फॉर इमोशन रिग्नेझशन फ्रॉम मल्टिमोडल डेटा युजींग डीप लर्निंग या विषयावर उत्कृष्ट, अभ्यासपूर्ण व नियोजनबद्ध संशोधन पूर्ण केले. प्रा. रोचलानी सर यांनी एक पेटेंट पैब्लिश केले असेउण एक कॉपी राइट रजिस्टर केले आहे. प्रा. योगेश रोचलनी मागील 12 वर्षांपासून श्री हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागात प्राध्यापक म्हणून यशस्वी कार्य करीत आहेत. त्यांना प्राप्त आचार्य पदवी द्वारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये निश्चितपणे वाढ होईल. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, कार्याध्यक्ष एड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव प्रा. विकास कोळेश्वर, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख तसेच मंडळाचे आतंरराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके यांच्यासह समस्त पदाधिकारी व प्राध्यापक वर्गार्ते प्रा. रोचलानी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या महत्वुपर्ण संशोधनाकरीता मार्गदर्शक व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली राऊत यांच्या कार्याची सर्वस्तरावरून प्रशंसा होत असून प्रा. योगेश रोजलानी यांनी प्राचार्य डॉ. राऊत यांचे आभार व्यक्त केले आहे.




