प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटला 3 राष्ट्रीय पुरस्कार
शिमला येथे डॉ.अजय ठाकरे यांचा सत्कार

* हिमाचलचे महामहिम यांची उपस्थिती
अमरावती /22 सटेंबर : शिमला येथे आयोजित एडुस्किल कनेक्ट 2025 या राष्ट्रीय परिषदेत प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट (झठचउए-च्) ला तीन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले, जे महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. यात सर्वोत्कृष्ट कार्यरत अभियांत्रिकी महाविद्यालय 2025 प्राचार्य उत्कृष्टता पुरस्कार – प्राचार्य डॉ. अजय ठाकरे यांना प्रा. के.के. अग्रवाल, सार्क विद्यापीठाचे कुलगुरू आणि एन.बी.ए. चे पूर्व अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आला. दुसरा पुरस्कार प्रशिक्षण व प्लेसमेंट व व्यवस्थापन अभ्यास विभागातील उत्कृष्टतेसाठी – डॉ. शशिकांत थोरात, डीन टी अँड पी व विभाग प्रमुख, व्यवस्थापन अभ्यास विभाग यांना राघब दास, सल्लागार एआयसिटीइ तसेच सहसचिव राज्यसभा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसंच उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय हा पुरस्कार एडुटेकचे सीईओ डॉ. सुभाजीत जगदेव यांच्या हस्ते देण्यात आला, जो पुरस्कार प्राचार्य डॉ. अजय ठाकरे, डॉ. लोभस घडेकर व डॉ. शशिकांत थोरात यांनी स्वीकारला. या तीन दिवसीय परिषदेत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल महामहीम श्री प्रताप शुक्ला, सिनेअभिनेता आशिष, विद्यार्थी तसेच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. हे पुरस्कार महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता, प्रभावी नेतृत्व आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे प्रतीक आहेत. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष डॉ. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी तसेच कार्यकारी सदस्य नितीन हिवसे, डॉ. पूनामताई चौधरी, श्री पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड आणि प्रा. गजानन काळे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.




