प्रविण पोटे पाटील यांचेकडून नुकसानग्रस्तांना 3 ट्रक साहित्य रवाना

अमरावती : माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या वतीने धाराशिव आणि सातारा येथील अतिवृष्टीग्रस्तांना मदत पोहोचविण्यासाठी कणिक, तांदूळ, डाळ, साखर, तेल, पोहे, बेसन, रवा, मुरमुरे, मीठ आणि चहापत्ती या सामग्रीचे तीन ट्रक पाठवण्यात आले. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावतीत या ट्रकला झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणही उपस्थित होते. यापूर्वी प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 लाख रुपयांचा धनादेशही दिला होता.




