प्रमोद शिंदे यांची तपोवनला सदिच्छा भेट

अमरावती /16 जानेवारी : मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा चे कार्यकारी संचालक प्रमोदजी शिंदे यांनी आपल्या पदाधिकार्यांसोबत डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनला नुकतीच सदिच्छा भेट देऊन तपोवन मध्ये सुरू असलेल्या मानवतावादी कार्याची पाहणी केली. स्वामी विज्ञानानंदा यांची 50 वर्षांपूर्वी लोणावळा येथे स्थापित केलेल्या मनशक्ती प्रयोग केंद्राचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने तरुण पिढीमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच मनाची एकाग्रता मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने दि. सहा व सात जानेवारी रोजी ब्रजलाल बियाणी महाविद्यालयात शिबिर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मन शक्ती प्रयोग केंद्राचे कार्यकारी संचालक प्रमोद शिंदे आपल्या पदाधिकार्यांसह अमरावतीत आले असता 78 वर्ष जुनी असलेल्या मानवतावादी पृष्ठ बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणार्या डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन ल त्यांनी आवर्जून भेट दिली.
कार्यकारी संचालक प्रमोद शिंदे यांचे स्वागत सत्कार तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी शाल पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत आलेले मनोज पाटील छोटू वरणगावकर राजेंद्र पाटील यांच्या हि याप्रसंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर तपोवन संस्थेमध्ये कृष्णबांधवांच्या पुनर्वसनासाठी चालवले जाणारे उपक्रम प्रकल्पाची माहिती उद्योगधंदे शाळा गोशाळा या उपक्रमांसोबत मेळघाटातील 70 आदिवासी मुलांच्या शैक्षणिक संगोपणसाठी संस्था करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती तपोवन अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी दिली. यावेळी मनशक्तीचे संचालक प्रमोद शिंदे यांनी संस्थेतील आदिवासी मुलांना एकाग्रतेबाबत माहिती गोष्ट रूपाने सांगितली. यावेळी तपोवनचे सचिव सहदेव गोळे उपसचिव ऋषिकेश देशपांडे उपअधीक्षक योगेश करडे अंतर्गत व्यवस्थापक भास्कर शेटये निवृत्ती वेलकर आदी उपस्थित होते.




