प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार लोखंडे यांना डांबून ठेवले

अनेक कार्यकर्ते कॅबिनमध्ये झेंडे घेऊन दाखल

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

अमरावती /13 जून: बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या 6 दिवशीही शासनाने दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी भगतसिंग स्टाईलने आंदोलन केले. बच्चू कडू यांच्या समर्थनात प्रहार पदाधिकार्‍यांनी विविध ठिकाणी तीव्र निदर्शने करीत आहेत. वरुडमध्ये एका प्रहार कार्यकर्त्याने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी प्रहार कार्यकर्त्यांनी नवीन तहसील कार्यालयात प्रवेश करून जोरदार निदर्शने केली.एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांनी तहसीलदार लोखंडे यांना डांबून ठेवले. प्रहारचे डझनभर कार्यकर्ते केबिनमध्ये तळ ठोकून होते. या कार्यकर्त्यांच्या हातात बच्चू कडू यांचा फोटो असलेले झेंडे होते. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदारांना सुरक्षितपणे काहीवेळ केबिनमध्ये डांबून ठेवले होते. त्यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला होता. प्रहार कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज होते.

संबंधित बातम्या

Back to top button