पीपीटी व ई.व्ही.एम. हँड्स-ऑन प्रशिक्षण यशस्वी

मतदान प्रक्रिया प्रभावी व पारदर्शक राबविण्यासाठी विविध झोनअंतर्गत

अमरावती /10 जानेवारी : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुयोग्य, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा एक भाग म्हणून विविध झोनअंतर्गत नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पीपीटीद्वारे सैद्धांतिक तसेच ई.व्ही.एम. हँड्स-ऑन पद्धतीने प्रात्यक्षिक प्रशिक्षण शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी विविध ठिकाणी यशस्वीरीत्या संपन्न झाले.
झोन क्र. 2 अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. अनिल भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 2.00 ते 3.30 या कालावधीत वार्ड क्र. 3 नवसारी व वार्ड क्र. 4 जमील कॉलनी-लालखडी येथील मतदान कर्मचार्‍यांसाठी सांस्कृतिक भवन सभागृह, मोर्शी रोड, अमरावती येथे पीपीटीद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, निवडणूक आचारसंहिता, मतदान केंद्रावरील जबाबदार्‍या, मतदारांना सहकार्य तसेच निवडणूक संबंधित नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर दुपारी 3.30 ते 5.00 या वेळेत वार्ड क्र. 7 जवाहर स्टेडियम अंतर्गत आय.टी.आय. हॉल, मोर्शी रोड येथे ई.व्ही.एम. हँड्स-ऑन प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये मतदान यंत्रे उघडणे, बंद करणे, मॉक पोल, मतमोजणीसंबंधी प्राथमिक माहिती याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
झोन क्र. 3 अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती दुर्गा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेत वार्ड क्र. 11 फ्रेजरपुरा-रुख्मिणी नगर व वार्ड क्र. 12 स्वामी विवेकानंद कॉलनी, बेलपुरा येथील कर्मचार्‍यांसाठी संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह येथे पीपीटी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेतील सूक्ष्म बाबी, अधिकारी-कर्मचार्‍यांची भूमिका, कायदेशीर तरतुदी व आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची दक्षता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12.00 ते 1.30 या वेळेत वार्ड क्र. 18 राजापेठ-श्री संत कंवरराम अंतर्गत वि.म.वि. परिसर, अमरावती येथे ई.व्ही.एम. हँड्स-ऑन प्रशिक्षण संपन्न झाले. यानंतर दुपारी 12.00 ते 1.30 या वेळेत वार्ड क्र. 17 गडगडेश्वर, रविनगर अंतर्गत आय.टी.आय. हॉल, मोर्शी रोड येथे ई.व्ही.एम. हँड्स-ऑन प्रशिक्षण घेण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button