पी.आर.पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्लेसमेंट डे’

विद्यार्थ्यांनी एकत्र येत साजरा केला प्लेसमेंटचा आनंदोत्सव

अमरावती/29 एप्रिल: पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे ‘प्लेसमेंट डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी महाविद्यालयातील तब्बल 415 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय सॉफ्टवेअर व कोअर कंपन्यांमध्ये निवड झाली असून, या उल्लेखनीय यशाचा आनंद साजरा करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या यशाचा आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन व प्राध्यापकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाकडून दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम यामुळेच हे यश मिळाल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा यशाची नोंद करावी, अशी अपेक्षा व्यवस्थापनाने व्यक्त केली. या ‘प्लेसमेंट डे’मुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली. कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.

संबंधित बातम्या

Back to top button