गुंतागुंतीच्या यकृत शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

अमरावती / 11 फेब्रुवारी : अमरावती जिल्ह्यातील 55 वर्षीय पुरुष रुग्णाला पोटदुखी आणि सतत अशक्तपणा जाणवण्याच्या तक्रारी होत्या. त्यांच्यावर एसएमएचआरसी येथे यशस्वी उपचार करण्यात आले.रुग्णाला एसएमएचआरसी च्या शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले होते. सखोल वैद्यकीय तपासणी आणि प्रगत इमेजिंगमध्ये यकृताच्या डाव्या भागात मोठी गाठ आढळून आली, जी कर्करोगाची असण्याची शक्यता होती.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या संयुक्त चर्चेनंतर गाठ पूर्णपणे काढण्यासाठी आणि भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी यकृताच्या डाव्या भागाची मोठी शस्त्रक्रिया (लेफ्ट हेपॅटेक्टॉमी) करण्याचा निर्णय घेण्यात आला.शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ शस्त्रक्रिया टीमने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व यशस्वीपणे पार पाडली. ज्यामध्ये यकृताचा रोगग्रस्त भाग पूर्णपणे काढून टाकण्यात आला आणि निरोगी यकृत सुरक्षित ठेवण्यात आले. योग्य शस्त्रक्रिया नियोजन, अनुभवी डॉक्टर, शस्त्रक्रिया कौशल्य, भूलतज्ज्ञ, नर्सिंग व सहाय्यक कर्मचार्‍यांच्या उत्तम समन्वयामुळे ही शस्त्रक्रिया कमी रक्तस्रावात आणि कोणतीही गुंतागुंत न होता यशस्वीरित्या पूर्ण झाली.ही शस्त्रक्रिया सिनियर जीआय सर्जन व अ‍ॅचडजंक्ट फॅकल्टी डॉ. सुधीर टोमे यांच्या नेतृत्वाखालील शस्त्रक्रिया टीमने यशस्वीपणे पार पाडली. या टीममध्ये शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. राजीव सोनारकर, जीआय सर्जन डॉ. आरती किरांगे, ज्येष्ठ सर्जन डॉ. वंदना टोमे, डॉ. दानिश, डॉ. आशिष आणि डॉ. रुपेश यांचा समावेश होता. त्यांना ज्युनियर निवासी डॉक्टर डॉ. संदीप, डॉ. गौरव, डॉ. सिमरन आणि डॉ. अमेव यांनी मोलाची साथ दिली. भूलतज्ज्ञांच्या टीममध्ये डॉ. पी. देशमुख, डॉ. अंजली मोडक, डॉ. रंजीत, डॉ. शिवानी आणि डॉ. जोसेफ (जेआर) यांचा समावेश होता. शस्त्रक्रियेदरम्यान तसेच नंतर रुग्णाची प्रकृती स्थिर राहावी यासाठी या टीमची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.

संबंधित बातम्या

Back to top button