नागापूर आश्रमशाळा प्रकरणात पटेल पिता-पुत्रांना जामीन

आदिवासी विद्यार्थिनीच्या मृत्यूवरून पेटले होते आंदोलन

* गंभीर गुन्हे दाखल, न्यायालयाकडून मोठा दिलासा

अमरावती /13 ऑगस्ट : चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा परिसरात गत महिन्यात पाणी टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या अपघातात सुमरती सोमा जामुनकर (विद्यार्थिनी) हिचा मृत्यू झाला, तर तीन आदिवासी मुली गंभीर जखमी झाल्या. या घटनेने संपूर्ण मेलघाट हादरला होता. या दुर्दैवी घटनेनंतर मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी माजी आमदार राजकुमार पटेल, त्यांचा मुलगा रोहित पटेल आणि शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले. धारणीच्या मार्गावर तणावपूर्ण परिस्थिती- आंदोलनकर्त्यांनी मृत विद्यार्थिनीचा मृतदेह आणि कुटुंबीयांना घेऊन धारणी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. मात्र, चिखलदरा पोलिसांनी मध्येच त्यांना अडवले आणि अंत्यसंस्कारासाठी गंगाखेडला जाण्याचा सल्ला दिला. या वेळी आंदोलनकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक वाद, धक्काबुक्की झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहित पटेल यांनी आपल्या गाडीने पोलिस कर्मचार्‍यांवर धडक देण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण आणखी चिघळले. गुन्हे दाखल आणि अटक-घटनेनंतर पोलिसांनी हत्या प्रयत्न, सरकारी कामकाजात अडथळा, कायदा-सुव्यवस्था भंग अशा गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवले. त्यानंतर पटेल पिता-पुत्रांसह अनेक समर्थकांना अटक करण्यात आली.अटकेनंतर राजकुमार पटेल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना परतवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर रोहित पटेल आणि इतरांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button