लोकशाहीचा उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा!

पथनाट्याच्या साहाय्याने नव मतदारांना मतदान करण्याचे आव्हान

अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांचे आव्हान

अमरावती /1 जानेवारी : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. मनपा आयुक्त माननीय सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (डतएएझ) विभागामार्फत शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदार जनजागृती केली जात आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यशोदा नगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय उत्तम नगर येथे उपस्थित प्राध्यापक ,नव मतदार विद्यार्थी, नागरिक व मतदार यांच्यासाठी महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. दि. 15 जानेवारी 2026 रोजी होणार्‍या महानगरापालिका सार्वत्रिक निवडणूक मध्ये आपला मतदानाचा हक्क बाजावून या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घ्यावा असे आव्हान श्रीमती शिल्पा नाईक अतिरिक्त आयुक्त यांनी केले तसेच उपस्थित प्राध्यापक, नव मतदार विद्यार्थी व नागरिकांनी मतदानची शपथ घेतली. पथनाट्याच्या माध्यमातून मतदान का आवश्यक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक मताचे महत्त्व काय आहे, तसेच मतदान न केल्यास होणारे परिणाम याविषयी प्रभावी सादरीकरण करण्यात आले. मतदानाच्या दिवशी सुट्टी असली तरीही प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणे का गरजेचे आहे, याचे प्रात्यक्षिक देखील यावेळी सादर करण्यात आले. या उपक्रमाला उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास स्वीप नियंत्रण अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कमलाकर पायस, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, कैलास कुलट, सुमेश वानखडे, संजय बेलसरे, निजामउद्दीन काझी, सुषमा दुधे, शुभांगी सुने,ज्योती बनसोड शाळा निरीक्षक व प्राध्यापक आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अमरावती महानगरपालिका व स्वीप विभागाच्या या टक्का निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button