संत्रा व्यापारी इस्तियाक मिर्झा यांचे अपघाती निधन

मध्यप्रदेशातील सारंगपूर नजीक स्कापीॅओ धडकली पुलाला

वरुड । 24 नोव्हेंबर – शहरातील ताज नगर परिसरातील प्रसिद्ध संत्रा व्यापारी इस्तियाक मिर्झा हबीब मिर्झा यांचा मध्यप्रदेशातील सारंगपूर नजिक झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अत्यंत सुसभावी आणि व्यवसायाशी प्रामाणिक असलेल्या इस्तियाक मिर्झा यांच्या निधनाचे वृत्त वरुड शहरात येऊन धडकतात शहरात शोक व्यक्त केल्या जात आहे.
इस्तियाक मिर्झा (45) हे एम.एस.27 डीव्ही 4993 क्रमांकाच्या स्कार्पिओने वरुड वरुन भवानीमंडी कडे संत्रा व्यवसायाच्या निमित्ताने जात होते. त्यांचे समवेत त्यांचे दोन समव्यवसायिक सुद्धा होते. रात्री दीड वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशातील सारंगपूर नजीक अचानक इस्तियाक मिर्झा यांचे स्कार्पिओ वरील नियंत्रण सुटले आणि स्कार्पिओ थेट पुलाला जाऊन धडकली. काही क्षणातच स्कार्पिओ पुलाच्या खाली सुद्धा जाऊन आढळल्याचे कळते. या अपघातामध्ये इस्तियाक मिर्झा यांचा जागीच मृत्यू झाला तर स्कार्पियो मधील दोघे गंभीररित्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करुन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरहता नजीकच्या रुग्णालयात तर अपघातात जखमी झालेल्या दोघांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. आज सकाळच्या सुमारास शहरात ही वार्ता वार्‍यासारखी पसरली आणि अनेकांनी ताज नगर परिसरातील इस्तियाक मिर्झा यांच्या निवासस्थानी जावुन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. आज दुपारच्या सुमारास इस्तियाक मिर्झा यांचे पार्थिव वरुड शहरात आणण्यात आले आणि रात्री 8 च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर स्वकीय, आप्तेष्ट आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक बब्बुभाई याराना वाले यांंचे भाचे होते. यांच्या निधनाने वरुड शहरात शोक व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button