नगराध्यक्षासाठी एक तर नगरसेवक पदासाठी केवळ 11 अर्ज दाखल

अंजनगावात कागदपत्रांच्या चक्रात उमेदवारांची पावले रेंगाळली

अंजनगाव सुर्जी/14 नोव्हेंबर : नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पाचव्या दिवशी पोहोचली असली तरी अपेक्षित प्रमाणात अर्ज दाखल झालेले दिसत नाहीत. आज (14 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी फक्त एक तर नगरसेवक पदासाठी अवघे 11 अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले. उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात उमेदवारांची मोठी धांदल उडाली असून, पक्षीय होकाराची प्रतीक्षा करत अर्जदार मागे थांबले असल्याचेही जाणवत आहे. अवघ्या दोन दिवसांत नामनिर्देशनाची अंतिम तारीख येत असल्याने, येत्या शनिवार-रविवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी होणार हे निश्चित झाले आहे. नगरपरिषदेत एकूण 28 नगरसेवक निवडायचे असून, प्रमुख पक्षांकडून किमान 50 च्या आसपास अर्ज येण्याची अपेक्षा असताना फक्त 11 अर्जच दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यावेळी निवडणूक अधिकारी राजेश्वर हांडे, सहायक निवडणूक अधिकारी विजय लोहकरे आणि पुष्पा डाबेराव यांच्या देखरेखीखाली आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. यावेळी अंजनगाव सुर्जी पोलिस स्टेशनचे निरीक्षक बंदोबस्तासाठी पथकासह हजर होते.

आज दाखल झालेले उमेदवारी अर्ज (क्रमाने एकामागून एक)

नगराध्यक्ष                              पद
अविनाश गायगोले –                भाजप
                  नगरसेवक पद
रजनी नारायण पाटील – प्रभाग 1 अ (शिवसेना-उबाठा)
नंदकिशोर नारायण रंधे – प्रभाग 3 ब (शिवसेना-उबाठा)
सुनीता मनोहर मुरकुटे – प्रभाग 4 अ (भाजप)
प्रमोद नारायण धाकतोंडे – प्रभाग 10 अ (भाजप)
मो. आबीद शे. महेमूद – प्रभाग 11 अ (खछउ)
मो. अबीद शे. महेमुद – प्रभाग 11 अ (छउझ – शरद पवार गट)
अजिजबी मो. फईमोद्दीन – प्रभाग 11 ब (खछउ)
अजीजबी मो. फाईमोद्दीन – प्रभाग 11 ब (छउझ – शरद पवार गट)
मो. नाजिम मो. अयुब – प्रभाग 12 ब (अपक्ष)
शेख नासिर शेख इसा – प्रभाग 13 ब (छउझ)
पुरुषोत्तम रामभाऊ तायडे – प्रभाग 14 अ (भाजप)

संबंधित बातम्या

Back to top button