प्रजासत्ताक दिनी विद्यार्थी करणार देशभक्तीपर सामुहिक कवायत संचलन

शिक्षण मंत्री दादा भुसे राहणार उपस्थित

* शिक्षण विभागाचा महत्वकांक्षी उपक्रम

* सर्वच शासकीय व खासगी शाळा होणार सहभागी

* शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती

अमरावती / 22 जानेवारी – विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती, सामाजिक बांधिलकी रुजावी या साठी यावर्षी प्रथमच संर्पुण राज्यासह अमरावती जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी शासकीय, खासगी शाळांमधील सर्व विद्यार्थी एकाच वेळी देशभक्तीपर गितांवर सामोहिक कवायत संचलन करणार आहे. शहरात चार ठिकाणी व जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यातील प्रत्येकी 3 ठिकाणी सामुहिक कवायत संचलन होणार असुन अमरावती शहरातील कवायत संचलनाला शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित राहणार असल्याची माहिती आज 22 जानेवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिक्षण मंडळाच्या सचिव निलिमा टाके, शिक्षण अधिकारी प्रिया देशमुख, सतिश मुगल यांनी दिली.
जिल्ह्यातील अमरावती, अंजनगाव सुर्जी , अचलपुर, भातकुली, चांदुर रेल्वे, चांदुर बाजार, चिखलदरा, धामनगाव रेल्वे, दर्यापुर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, धारणी, मार्शी व वरुड या 14 तालुक्यातील 2866 जिल्हापरिषद शाळा, नगरपरिषद शाळा आणि खासगी अनुदानित, विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील 34 हजार 725 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहे. शहरात मनपाच्या सर्व शाळातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून शहरात चार ठिकाणी हा देशभक्तीपर गितांचा सामोहिक कवायत संचलन होणार असून अमरावती पोलिसांच्या मुख्यालय मैदानातील कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दादा भुसे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. 14 तालुक्यातील 10 लाख विद्यार्थी या सामोहिक उपक्रमात एकाच वेळी कवायत संचलन करणार असल्यामुळे प्रजासंक्ताक दिनी एक देशभक्तीमय वातावरण निर्मीती होणार आहे. या बाबत शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
विद्यार्थी व पालाकांमध्ये कमालीचा उत्साह-संपुर्ण राज्यात व अमरावती जिल्ह्यात प्रथमच शिक्षण विभागाने देशभक्तीपर गीतांवर सामुहिक कवायत संचलन हा महत्वकांक्षी उपक्रम आयोजित केल्या मुळे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये प्रजासत्ताक दिनी होणार्‍या या उपक्रमाबाबत कमालिची उत्सुकता असल्याचे दिसुन येते.

 

संबंधित बातम्या

Back to top button