ओम खोडसाळ राज्यस्तरावर; कुराश स्पर्धेत सिल्वर मेडल

अमरावती /4 डिसेंबर :  श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा कुस्तीपटू ओम दिनेश खोडसाळ याने राज्यस्तरावर आणखी एक यशाची नोंद केली आहे. दि.27 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे, इंदापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुराश स्पर्धेत ओमने 19 वर्षे वयोगटातील 60 किलो वजन गटात प्रभावी खेळांचे प्रदर्शन करीत रौप्य पदक (सिल्वर मेडल) पटकावले.श्री हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, कार्याध्यक्ष एड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ.माधुरीताई चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव प्रा. विकास कोळेश्वर, सचिव रवींद्र खांडेकर, मुख्याध्यापिका सौ. वाडेगावकर उपमुख्याध्यापिका सौ आडे पर्यवेक्षक श्री खोब्रागडे तसेच शाळेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक संजय मालवीय यांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

Back to top button