सेमाडोह येथे एनएलएसचे महाअभियान उत्साहात

आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचे लाभ

चिखलदरा/19 ऑक्टोबर  : सेमाडोह, दि. 18 ऑक्टोबर 2026 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली; महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती; जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती आणि जिल्हा परिषद, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने एनएलएस अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांची स्थानिक स्तरावर अंमलबजावणी महाअभियान’ हा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा, सेमाडोह येथे उत्साहात पार पडला.
दुर्गम मेळघाटातील आदिवासी व वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचविणे, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना न्याय व शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून देणे हा या महाअभियानाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल सत्यविजय किलोर, न्यायमूर्ती तथा अमरावतीचे पालक न्यायमूर्ती प्रवीण शेषराव पाटील आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती उज्ज्वला नंदेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Back to top button