पेट्रोल पंप चालकांपुढे नवे आर्थिक संकट

इंधनासाठी आता ’अ‍ॅडव्हान्स पेमेंट’

* पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची वाहनधारकांमध्ये भीत

अमरावती / 19 मार्च – गॅसच्या रांगेत उभा असलेला सामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना, आता पेट्रोल आणि डिझेलसाठीही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी इंधन पुरवठ्याबाबत नवीन आदेश जारी केले आहेत. यानुसार, जोपर्यंत पेट्रोल पंप चालक टँकरची रक्कम कंपनीच्या खात्यात आगाऊ जमा करत नाहीत, तोपर्यंत इंधनाचा पुरवठा केला जाणार नाही. ’आधी पैसे, मग डिलिव्हरी’ या धोरणामुळे पंप चालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पुरवठ्यावर होणार परिणाम तेल कंपन्यांनी ’क्रेडिट’वर इंधन देणे बंद केल्यामुळे अनेक पेट्रोल पंप कोरडे पडण्याची शक्यता आहे. जर वेळेत पैसे जमा झाले नाहीत तर इंधन मिळणार नाही. याचा फटका थेट वाहतूकदार आणि खाजगी बस चालकांना बसू शकतो. पूर्वी तेल कंपन्यांकडून उधारीवर इंधन मिळत असे, परंतु जागतिक संकट पाहता ही सुविधा बंद करण्यात आली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमने गेल्या आठवड्यापासून हे नियम लागू केले आहेत. तर इंडियन ऑईलने पाच दिवसांची क्रेडिट पॉलिसी स्थगित केली आहे. यामुळे पेट्रोल पंपावर रांगा लागण्याची शक्यता असली तरी ग्राहकांना इंधन मिळत राहील, असे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button