सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी चांगल्या उपक्रमाची गरज

स्व.माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेला थाटात सुरुवात

हेमंत काळमेघ यांचे प्रतिपादन

अमरावती /5 जानेवारी : सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी चांगल्या उपक्रमाची गरज आहे. वकृत्वातून भाऊसाहेब घडले. भाऊसाहेबांना अपेक्षित असणारे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले.
स्व. माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सोमवार,दि.5 जानेवारी 2026 रोजी सकाळी अकरा वाजता वाजता डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेला थाटात सुरुवात झाली.
शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सव निमित्ताने आयोजित ही स्पर्धा ‘भारताच्या विकास प्रक्रियेत तरुणांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आयोजित करण्यात आली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रा. डॉ. एकनाथराव तट्टे, प्रा. डॉ.स्वप्नील इंगोले, प्रा. बायदनी, आजीवन सभासद आनंदराव देशमुख, पप्पू उर्फ मंगेश पाटील,प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख, संयोजक प्रफुल्ल घवळे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना हेमंत काळमेघ म्हणाले की भाऊसाहेबांसारखे रोल मॉडेल डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी आपल्या वेळेचे नियोजन करायला पाहिजे. भाऊसाहेब वक्तृत्वातून घडले. त्यांना अपेक्षित असणारे विद्यार्थी अशा प्रकारच्या स्पर्धेतून निर्माण होत आहे. आजची तरुणाई भरकटलेली असताना त्यांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन अशा प्रकारच्या उपक्रमातून होते म्हणून हीच खरी महापुरुषांना श्रद्धांजली आहे असे यावेळी ते म्हणाले. प्राचार्य वर्षा देशमुख यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा डॉ.शितलबाबू तायडे यांनी परीक्षक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक वैशाली घवळे(गरकल)यांनी केले. संचालन प्रा.रत्नाकर शिरसाट तर आभार प्रदर्शन मयूर चौधरी यांनी केले. स्पर्धेत विषयाच्या अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही बाजूंनी विचार मांडणारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महाविद्यालयीन संघ सहभागी झाले. उशिरा रात्रीपर्यंत स्पर्धा सुरू होती. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण फेसबुक व युट्यूबच्या माध्यमातून करण्यात आले. स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी प्रा.डॉ.विलास नांदुरकर यांची निवड करण्यात आली. विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले अभ्यासपूर्ण मत मांडून स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

संबंधित बातम्या

Back to top button