नवनित राणा भाजप पराभूत उमेदवारांच्या घरी

अमरावती / 25 जानेवारी – भाजपच्या स्टार नेत्या व माजी खा.नवनित राणा यांनी महानगरपालिकेत पराभुत भाजप उमेदवारांच्या घरी जावुन भेटी घेतल्या. एकीकडे भाजपच्या एका गटाने नवनित राणांवर भाजप उमेदवाराच्या पराभवाचे खापर फोडण्याचा प्रयत्न चालविला असतांना नवनित राणा यांनी अमरावती महानगराचा दौरा सुरु केला.
भाजप पराभुत उमेदवार बादल कुळकर्णी, श्रीमती संध्या टिकले, स्वाती निस्ताने, संगीता बुरंगे, अविनाश देऊळकर, अॅड. अपर्णा अमोल ठाकरे, गंगाताई खारकर, माजी उपमहापौर कुसुम साहु, सौ योजना बिठे, नितीन बोरेकर, नरेश देशमुख, धिरज बारबुध्दे, निता राउत, प्रतिभा खंडारे, वंदना हरणे, सरिता मालानी, सुनिल काळे यांच्या भेटी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. भेटीदरम्यान स्थानिक वार्ड भाजप नेते नवनित राणा यांच्यासोबत होते. राजापेठ प्रभागातील भाजप समर्थित अपक्ष उमेदवार अॅड.अपर्णा अमोल ठाकरे यांची नवनित राणा यांनी भेट घेतली. भेटीदरम्यान नवनित राणा असं म्हणाल्या की, मला आपला पराभव झाल्याचे खुप दुःख आहे. यावर अॅड. अपर्णा ठाकरे यांनी माझे व्यक्तीगत पराभवापेक्षा मतदारांवर भाजपचा प्रभाव असतांना भाजप उमेदवाराचा पराभव हा दुःख देणारा आहे असं त्या म्हणाल्या. अॅड. ठाकरे यांच्यासोबत नवनित राणांनी सविस्तर चर्चा केली. पराभव झाला तरी खचुन जावु नका. आपण नेहमी सोबत राहु अशी सांत्वना नवनित राणा यांनी दिली. भाजपचा एकही मोठा नेता पराभुत उमेदवारांच्या घरी गेलेला नाही. फोन च्या माध्यमातुन पराभवाचे आम्हाला दुःख झाले. एवढीच सांत्वना देण्यात आली. मात्र नवनित राणा यांनी पराभुत उमेदवारांच्या घरी जावुन कुटुंबियांशी, समर्थकांशी मनमोकळा संवाद केला. ज्या, पराभुत भाजप उमेदवाराच्या मनात कुठेतरी स्वाभिमान पक्षामुळे आपला पराभव झाला असु शकतो. अशी शंकेची पाल चुकचुकत होती तिथे मात्र नवनित राणा स्वतः पोहचल्यामुळे जखमेवर मलम लावण्याचं काम झालं. अनेक पराभुत उमेदवारांनी जाहीरपणे सांगीतले की, भाजपचे नेते प्रचारालाही येत नव्हते. त्यामुळे पराभवानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा आहे का ? भाजपचा राणा विरोधी गट नवनित राणांच्या विरोधात लुटुपुटची लढाई खेळत असतांना नवनित राणा मात्र पुन्हा एकदा मैदानात उतरल्या व त्यांनी पराभुताचेही मन जिंकले.
पराभुत भाजप उमेदवारांना साधं भेटण्याची तसदी कोअर कमिटीने घेतलेली नाही. ही बाब पराभुतांनी अत्यंत दुःखद अंतःकरणाने व्यक्त केली. आमच्या पराभवाला नवनित राणा जबाबदार नाही अशी जाहीर कबुलीच आता पराभुत उमेदवार देत आहेत. नवनित राणांच्या घरभेटी उपक्रमातुन पराभुत उमेदवारांना आता नव्याने घरभेदी कोण आहेत? हे कळायला लागलं आहे.




