स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिवस उत्साहात
जी.एच.रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे आयोजन

अमरावती /16 जानेवारी : जी एच रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विश्वविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने अंजनगांव बारी येथे जनजागृती रॅली काढण्यात आली.
विश्वविद्यालयाचे कुलपति डॉ. विनायक देशपांडे यांनी रॅलीत मार्गदर्शन करताना सांगितले की, स्वदेशी हा नारा फक्त भारतीय वस्तूंचा वापर करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा आणि प्रगतीचा मार्ग आहे. स्वदेशीचा मंत्र आत्मसात केल्यास देशाच्या प्रत्येक नागरिकाची उन्नती होईल आणि युवकांसाठी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.रॅलीत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी वोकल फॉर लोकल आणि स्वदेशीचा नारा बुलंद करून जनमानसात जागृती निर्माण केली. स्वामी विवेकानंद यांनी युवकांना जागृत करण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत डॉ. देशपांडे म्हणाले की, विवेकानंदजींनी युवकांना लक्ष्य गाठण्यासाठी सतत प्रयत्न करण्याचा संदेश दिला होता. त्यांच्या जयंतीनिमित्तच भारत सरकारने राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्वदेशीचा विचार घराघरात पोहोचवणे हा होता. स्वदेशी म्हणजे केवळ भारतात उत्पादित वस्तूंचा वापर नव्हे, तर भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रयत्न करणे असा त्याचा अर्थ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.अंजनगांव बारीचे ग्राम विकास अधिकारी सरपंच शोभाताई खडसे, उपसरपंच अरविंद निम्बार्ते यांच्या सहयोगाने यशश्वी झाले या कार्यक्रमात जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. स्नेहिल जायस्वाल, विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. अमर मोरे, एनएसएस इनचार्ज डॉ. विशाल सपाटे, बीसीए विभागप्रमुख डॉ. शैलेश ठाकरे, प्राध्यापक सारंग ठाकरे, नितिन चितले आणि जनसंपर्क अधिकारी अनिता यादव यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी प्रवीण भगत यांनी विशेष सहकार्य केले.या जनजागृती रॅलीने स्थानिक नागरिकांमध्ये स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेबाबत नवीन ऊर्जा निर्माण केली आहे.




