पी.आर.पोटे पाटील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये राष्ट्रीयस्तरीय स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धा
विद्यार्थ्यांनी अनुभवला आठ तासांचा कोडिंग थरार

* विजेत्या संघाला मिळणार दोन लाखांचे पारितोषिक
अमरावती /19 जानेवारी : पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, अमरावती येथे संस्थेच्या प्रतिष्ठित वार्षिक तांत्रिक महोत्सव टेकलॉन्स 2026 अंतर्गत आयोजित राष्ट्रीयस्तरीय हॅकॅथॉन 2026 मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा, नवोन्मेषी विचारांचा आणि समस्या-निराकरण क्षमतेचा प्रभावी प्रत्यय आला.
हॅकॅथॉनचे उद्घाटन पॅरिस्टंट सिस्टीम्स लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी नवोन्मेष, उद्योगाभिमुख कौशल्ये आणि समाजोपयोगी उपाय विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ कोडिंगपुरते न राहता वास्तवातील समस्या सोडवणारे तांत्रिक उपाय सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव शेअर करत त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला, ज्यामुळे संपूर्ण वातावरण प्रेरणादायी झाले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रविण पोटे पाटील, उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील, संचालक डॉ. पी. एम. खोडके, प्राचार्य डॉ. पी. एम. जावंधिया, उपप्राचार्य डॉ. मोहम्मद जुहैर सर्व डीन, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आठ तासांची कोडिंग मॅरेथॉन असलेल्या या हॅकॅथॉनसाठी एकूण 2 लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. विजेत्या संघास 1 लाख रुपये, तर पाच समस्या-विषयक विशेष बक्षिसे प्रत्येकी 20 हजार रुपये समारोपीय समारंभात देण्यात येणार आहेत. अंतिम फेरीसाठी देशभरातील विविध अभियांत्रिकी संस्थांमधून निवडलेल्या 50 संघांतील 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. हॅकॅथॉनमध्ये -I/ML in Healthcare, Generative -I in Supply Chain, -I for Training Placement, Industry 5.0 आणि जशिप खपर्पेींरींळेप अशा भविष्योन्मुख समस्या विधानांवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपाय सादर केले. विभाग प्रमुख डॉ विजय गडीचा यांच्या मार्गदर्शनात प्रा. अखिलेश तायडे व प्रा. ए. डी. चोखट यांनी काम समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच करमवीर सिंग ओबेरॉय, आयुष चेनानी आणि अथर्व खवाले यांनी तांत्रिक मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. विद्यार्थी समन्वयक यशोवर्धन ठाकरे व वैष्णवी सावरकर यांनी नोंदणीपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत सर्व जबाबदार्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. महाविद्यालयाच्या परिसरात पार पडलेल्या या हॅकॅथॉनमुळे नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.




