वडिलांनी आपली किडनी देऊन वाचविले मुलाचे प्राण
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, अमरावती येथे

अमरावती/22 मे-स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशलिटी) हॉस्पिटल अमरावती. येथे 72 वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सदर रुग्ण हा काही महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त असल्याने त्यासाठी बाहेर उपचार पद्धती चालू होती व काही महिन्यांपासून डायलिसिस करत होता. तेव्हा डॉक्टरांनी रुग्णास व त्याच्या कुटुंबीयास किडनी प्रत्यारोपण विषयी माहिती दिली व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ,अमरावती येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या यशस्वी व विनामूल्य शस्त्रक्रिया यासाठी रुग्ण विविध जिल्ह्यांमधून नव्हे तर इतर राज्यामधून सुद्धा येत असतात याविषयी महिती दिली.
तेव्हा आज रुग्णालयात झालेले 72 वे किडनी प्रत्यारोपण, हे 22 वर्षीय करण नक्कल बारंगे यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. सदर रुग्ण हा रा. पिंपरी,ता मोर्शी, जि. अमरावती येथील रहिवासी असून मागील काही महिन्यांपासून डायलिसिस चालु होते. मात्र डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून व होणारा त्रास बघुन किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे, असे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी मुलाच्या पुढील भविष्याचा विचार करून वडील नक्कल श्रीराम बारंगे (51) यांनी आपली एक किडनी मुलगा करण ला देण्याचा निर्णय घेतला, व आपली एक किडनी करण ला देऊन त्याला नवीन जीवन दिले. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामुल्य करण्यात आली.सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. प्रणित काकडे, डॉ नयन काकडे ,युरो सर्जन डॉ.राहुल पोटोडे, डॉ.विक्रम देशमुख, डॉ. प्रतिक चिरडे ,डॉ राहूल घुले , बधिरिकरण तज्ञ- डॉ. रोहित हातगावकर, डॉ बालकृष्ण बागवाले , डॉ. दिपाली देशमुख , डॉ अश्विनी मढावी, डॉ रमणिका ढोमणे, डॉ शीतल सोळंकी, डॉ.विक्रांत कुळमेथे, डॉ.माधव ढोपरे,डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ.नाहीद, डॉ. रमणीय,डॉ. उज्वल अभ्यंकर, डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. श्रद्धा जाधव,समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) शितल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ.सोनाली चौधरी,महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने मधील एम.सी.ओ.डॉ. पायल रोकडे ,डॉ. दिव्यांनी मुंदाने, कल्याणी गाढवे त्याचप्रमाणे अधीसेविका चंदा खोडके यांच्या सूचनेनुसार इन्चार्ज सिस्टर ज्योती तायडे, सरला राऊत, नीता कांडलकर, निलिमा मलवार, दिपाली तायवाडे, विवेक तायडे, वैष्णवी निकम, कीर्ती तायडे, अक्षय पवार, मयुरी खेरडे, ओम महल्ले ,अनु वडे,योगिश्री पडोळे,वैशाली ढोबळे, वैष्णवी टाकरखेडे ,कोमल भालेकर,रूपाली गवई , दीक्षा बेलखेडे, रेखा विश्वकर्मा, गोमकाळे, आहारतज्ञ कविता देशमुख, रश्मिता दिघडे, श्रीधर ढेंगे, औषध विभागामधील योगेश वाडेकर, अमोल वाडेकर, शुभम वरघडे , पंकज बेलुरकर, आशिष मिश्रा, सुनीता ठाकूर , अविनाश राठोड, तुषार नारायण , गजानन मातकर , रुपेश हरडे,शिवा भोंगाडे, दिपटे, भेंडकर, इंदू पाटील, गजानन चौधरी,प्रशांत थेटे, निलेश आत्राम इत्यादींचे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये विषेश सहकार्य होते.
आज 72 वे किडनी ट्रान्सप्लांट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या यशामागे संपूर्ण वैद्यकीय टीमचे समर्पण, कुटुंबीयांचा विश्वास आणि रुग्णाची सकारात्मक इच्छाशक्ती हे महत्त्वाचे घटक आहेत. विशेषतः वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे , आणि सर्व सहाय्यक वैद्यकीय कर्मचार्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे.
-डॉ.प्रणित काकडे (नेफरोलॉजिस्ट)




