अनैतिक संबंधातून खुन करणार्या मोर्शीच्या आरोपीस अटक
मोर्शी पोलिसांची 24 तासात कारवाई

मोर्शी /24 ऑक्टोबर : अनैतिक संबंधातून मोर्शी ते चांदूरबाजार रोडवर असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खुल्या जागेवर काल, दि. 23 ऑक्टोबर रोजी खून करण्यात आलेल्या आरोपीला मोर्शी पोलिसांनी जेरबंद केले. दि. 23/10/2025 रोजी फिर्यादी तेजस विनोदराव राऊत, वय 24 वर्षे, रा. समर्थ कॉलनी मोर्शी यांनी पोलीस स्टेशनला येवून रिपोर्ट दिला की त्याचे वडील, नामे विनोद भास्करराव राऊत, वय 52 वर्षे, हे कृषीविभाग कार्यालय चांदुरबाजार रोड मोर्शी येथे लिपिक पदावर कार्यरत होते. ते दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारास 8 वाजता लोण केसच्या कामासाठी अमरावती येथे जात असल्याचे सांगून घरून निघून गेले होते. फिर्यादींना माहीती मिळाली की त्यांच्या वडिलांशी तालुका कृषि कार्यालय चांदुरबाजार रोड मोर्शी येथील गार्ड यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाबाबत पति धनराज सुखदेव वानखडे याला माहिती मिळाल्याने त्याच्या मनामध्ये विनोद राऊत यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. याच द्वेषातून धनराज सुखदेव वानखडे, वय 52 वर्षे, रा. घाटलाडकी, ता. चांदुरबाजार, ह.मु. श्रीकृष्णपेठ मोर्शी यांनी विनोद भास्करराव राऊत यांची तालुका कृषी कार्यालय चांदुरबाजार रोड मोर्शी येथे हत्या केली. सदरच्या फिर्यादीवरून मोर्शी पोलिसांनी कलम 103(1) भारतीय न्याय संहितेअंवे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आणि आरोपी धनराज सुखदेव वानखडे याचा शोध घेऊन त्यास 24 तासांच्या आत अटक केली. आरोपीला विनोद राऊत यांचे त्याच्या पत्नीसोबत असलेले अनैतिक संबंध माहित असल्याचे आणि त्याच द्वेषातून त्याने खुन केल्याची कबुली दिली. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक राहुल आठवले ठाणेदार पो.स्टे. मोर्शी यांचे नेतृत्वात पो.स्टे. मोर्शी येथील पोउपनि शिवराज पवार, पोउपनि आकाश शिवणकर, पोलीस अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, अथर्व कोहळे यांनी केली असून, पुढील तपास पोउपनि राहुल गवई पो.स्टे. मोर्शी करीत आहेत.




