आ.सुलभा खोडके यांची झंझावाती पदयात्रा
विलास नगर प्रभागात घडयाळच्या प्रचारार्थ

राष्ट्रवादी काँग्रेच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन
अमरावती /4 जानेवारी – मागील पंचवार्षिक काळात विलास नगर – मोरबाग प्रभागात कोट्यवधींची विकास कामे करण्यात आल्याने प्रभागाचा कायापालट झाला असून विकासपर्व नांदत आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठा जनाधार असून पक्षाचे पुरोगामी विचार व धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा सुद्धा मोठा वर्ग आहे. प्रभागाच्या उर्वरित भागात आता विकास कामे करायची असल्याने अमरावती महानगर पालिका निवडणूक ही एक चांगली संधी आपणासर्वांसमोर आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या,असे आवाहन अमरावतीच्या आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी केले.
अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक – 6 विलास नगर -मोरबाग-गवळीपुरा मधील राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रथमेश गवई, सरोज सुगनचंद गुप्ता ,सौ.रिनाताई प्रवीण भोरे,अजेश बिजोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करून प्रभागातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आ.सुलभाताई खोडके यांनी प्रभागातील रमाबाई आंबेडकर नगर, कपिलवस्तू नगर , विलास नगर अशा भागात झंझावाती पदयात्रा करून नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान आमदार महोदयांनी चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरिकांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला. यावेळी जागोजागी आमदार महोदयांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांचे पुष्पहार व पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी सदर भागातही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी भेट देऊन कृपाशिर्वाद घेऊन महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी आमदार महोदयांशी संवाद साधतांना मागील काळात अनेक विकास कामे मार्गी लागल्याबद्दल आमदार महोदयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. स्थानिक भागात रस्ते , नाली , स्वच्छता व साफसफाई , सौंदर्यीकरण , पाणी पुरवठा , स्ट्रीट लाईट , क्रीडांगणाचा विकास, यासह स्थानिक लाभार्थ्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ, रमाई आवास योज़ना अशी अनेक कामे करणे यास प्राधान्य राहणार असून प्रभागाच्या विकासाला अधिक गती व बळकटी मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आज पर्यंत जी साथ दिली , पुढेही कायम ठेवून अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना पाठबळ देऊन निवडून आणण्याचे आवाहन आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी केले.




