आ. साजिद खान पठाण यांची ‘आपली मातृभूमि’ कार्यालयाला भेट

अमरावती : अकोला पश्चिमचे काँग्रेस आ. साजिद खान पठाण यांनी सोमवार दुपारी ’आपली मातृभूमि’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादक अनिल अग्रवाल यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी गुड्डू हमीद, अबरार साबीर, रियाज खान, अनवर खान, इरफान पठाण, मंजूर भाई आणि मो. युसूफ प्रामुख्याने उपस्थित होते.




