अंजनगाव सुर्जीत राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची सदिच्छा भेट
कृषी बाजार समितीत शेतकरी विकासाला नवे प्रोत्साहन

* ग्रामीण क्षेत्रातील संधी आणि पारदर्शक व्यवस्थेसाठी केले मार्गदर्शन
अंजनगाव सुर्जी/2 जानेवारी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शुक्रवार रोजी महाराष्ट्राचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे शेतकरी, व्यापारी आणि सहकारी क्षेत्राला नवे प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉ. भोयर यांनी भेटीत शेतकर्यांच्या अडचणी, बाजार समितीच्या पायाभूत सुविधा, सहकारी क्षेत्रातील संधी आणि ग्रामीण विकासाच्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. त्यांनी शेतकरी हित, पारदर्शक व्यवहार आणि बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी शासन स्तरावर आवश्यक ती मदत व सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले. भेटीत माजी आमदार प्रभूदास भिलावेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयंत साबळे व सदस्य अर्चना पखान, तसेच सुधीर गोळे, दिलीप भोपळे, मनिष कोरपे, गजानन धोटे, अमोल पोटे, सतीश मट्टे, श्रीकांत पवार, कृष्णा गोमासे, शांतनू भांबुरकर, संजय ढोक, विशाल पंडित, चोरे काका, विठ्ठल सावळे, कळमकर काका, अनंत रोकडे, सुबोध कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. भेटीच्या दरम्यान बाजार समितीच्या कामकाजाचा तपशीलवार आढावा घेतला गेला. शेतकर्यांच्या समस्या, कृषी उत्पादनाचे दर्जा, बाजार समितीतील पारदर्शक व्यवहार, सहकारी क्षेत्रातील संधी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासावर चर्चा झाली. राज्यमंत्री डॉ. भोयर यां4नी या क्षेत्राच्या प्रगतीसाठी पुढील उपाययोजना, योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासनाशी संवाद यावर भर दिला. उपस्थित मान्यवरांनी डॉ. भोयर यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने स्थानिक बाजार समितीला नव्या संकल्पना, विकासाची दिशा आणि शेतकर्यांसाठी प्रभावी उपाययोजना मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.या भेटीद्वारे अंजनगाव सुर्जी कृषी बाजार समितीला फक्त आर्थिक आणि पायाभूत विकासच नव्हे तर शेतकर्यांसाठी विश्वासार्ह मार्गदर्शन, सहकारी क्षेत्राची मजबूत साधने आणि पारदर्शक व्यवस्थापन यासाठीही नवी दिशा मिळाली आहे. स्थानिक स्तरावर ही भेट शेतकर्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारी आणि ग्रामीण प्रगतीला गती देणारी ठरेल, अशी उपस्थितांनी मते व्यक्त केली.




