मंत्री दत्तात्रय भरणे उद्या जिल्हा दौर्यावर

अमरावती /19 नोव्हेंबर : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे. दौर्या नुसार, मंत्री भरणे यांचे दुपारी 1.15 वाजता अमरावती विमानतळ आगमन होईल. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता शिराळा, ता. अमरावती येथे आयोजित कृषी मेळावा, कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहतील. सायंकाळी 4.30 वाजता अमरावती विमानतळ येथून विमानाने बारामतीकडे प्रयाण करतील.




