मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव नियोजनाबाबत बैठक

ऑनलाईन सुविधांसाठी दिले निर्देश

अमरावती /13 ऑगस्ट : येत्या गणेशोत्सवाच्या पोर्शभूमीवर अमरावती महानगरपालिकेतनियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक आज आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उत्सव काळातील सार्वजनिक व्यवस्थापन, मंडप परवानगी प्रक्रिया, स्वच्छता, वाहतूक व विसर्जन व्यवस्थेबाबत विविध निर्णय घेण्यात आले.यावेळी आयुक्तांनी नागरिकांना आणि गणेश मंडळांना अधिक सुलभ सेवा  देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याचे निर्देश  संबंधित अधिकार्‍यांना दिले.विशेषतः, गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया देखील या बैठकीत सविस्तरपणे सांगण्यात आली.ऑनलाईन फॉर्ममध्ये मंडळाचे नाव, आयोजकांचीमाहिती, मंडपाचा पत्ता, परवानगी आवश्यक असलेल्या शासकीय यंत्रणांची माहिती, तसेच सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनासंबंधीची माहिती भरावी लागेल.आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, गणेश मंडळ नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा सुरू करावी. मंडप परवानगी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करावी. 25 आर्टीफिशीयल टँक ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. दरवर्षीप्रमाणे प्रथमेश तलाव व छत्री तलाव येथे गणेश विसर्जनाकरीता गणेश मंडळाच्या मोठ्या गणपती विसर्जनाकरीता खोल खड्यांची निर्मिती करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे घरगुती विसर्जनाची त्याकरीता कृत्रिम तलावाची निर्मिती सुध्दा करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी से.दे. पाटील, जितेंद्र पुरते, डॉ.प्रियश्री देशमुख, वाहतुक पोलीस निरीक्षक प्रविण वांगे, रिता उईके, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, बाजार व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दिपक खडेकार, उदय चव्हाण, उपअभियंता श्रीरंग तायडे, आशिष अवसरे, विवेक देशमुख, अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, अभियंता शरद तिनखेडे, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button