सरन्यायाधीश गवई यांच्या समर्थनार्थ भव्य धरणे

शाहू, फुले, आंबेडकर, देशमुख फाउंडेशनचे नेतृत्व

* जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन
* अ‍ॅड.राकेश किशोर यांच्या कृत्याचा तीव्र निषेध

अमरावती /7 ऑक्टोबर : शाहू, फुले, आंबेडकर देशमुख फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत इर्विन चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भव्य निदर्शने करण्यात आली. यावेळी न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या निदर्शनाचे नेतृत्व डॉ. गणेश पाटील, अ‍ॅड. दिलीप एडतकर, डॉ. बी.आर. देशमुख, अ‍ॅड. पी.एस. खडसे, प्रा. गोपीचंद मेश्राम, किशोर बोरकर, भैय्यासाहेब निचळ, प्रा. अनिल देशमुख, भैय्या पवार, प्रा. डॉ. सुजाता झाडे, राजा चौधरी आणि संकेत पाटील यांनी केले. या घटनेचे वर्णन देशातील अशा प्रकारची पहिलीच घटना म्हणून करण्यात आले असून ती सर्वांसाठी धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे निदर्शनास आले. निषेध आंदोलनानंतर अ‍ॅड. राकेश किशोर यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात डॉ. बी.आर. वाघमारे, अ‍ॅड. दिलीप एडतकर, अ‍ॅड. पी.एस. खडसे, मिलिंद चिमोटे, किशोर बोरकर, डॉ. रविंद्र मुंदे, हरिभाऊ मोहोड, प्रदीप दंदे, प्रा. जगदीश गोवर्धन, चेतनदास इंगोले, भैय्यासाहेब निचत, प्रा. अनिल देशमुख, प्रा. किशोर फुले, राजाभाऊ चौधरी, प्राचार्य कमलाकर पायस, विजय गणवीर, पंकज मेश्राम, अजय लेंडे, वंदना थोरात, अनिल काझी, प्रा. सुजाता झाडे, विजय खंडारे, वैभव देशमुख, समीर जवंजाळ, अजय साबळे, अ‍ॅड. दीपक सरदार, सौरभ तायडे, धनंजय बोबडे, प्रयाल मोहोड, वृषाली गावंडे, गोविंद ठाकरे, प्रफुल तंतरपाळे, सिध्दार्थ भोयर, चिन्मय बोचे, दिनेश हरणे, पँथरचे हरिदास सिरसाठ, राजीव शब्दवाले, विजय वानखडे, शंकर प्रधान, वासुदेव आठवले, मनोहर खडसे, श्रीकृष्णा इंगोले, प्रभाकर वरघट, मदन गायकवाड, आनंद धंदर, अशोक डोंगरे, किरण गुडधे, संजय गडलिंग, विजय खंडारे, मिलिंद अहिरे, प्रा. अनिल देशमुख, सुरेश दहीकर, दादाराव दाभाडे, राजेश वानखडे, बाबाराव मेश्राम, प्रशांत तायडे, विकास थोरात, समाधान मेश्राम, पुरुषोत्तम काकडे, समाधान वानखडे, रविकांत गवई, विजय आठवले, एम.जी. कांबळे, भ्रमण बनसोड, महेंद्र आलेकर, राजू धवने, ओमप्रकाश बनसोड, मनोहरराव घोडेस्वार, दादासाहेब क्षीरसागर, सुरेश दहीकर, सुनील रामटेके, पंजाबराव रामटेके, धनराज कावरे, संजय भोवते आणि डॉ. संजय खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button