मराठवाडा 32 वा विद्यापीठ नामविस्तार सोहळा साजरा
भारतीय दलित पँथरचे आयोजन

अमरावती /15 जानेवारी : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा तब्बल 17 वर्षाचा संघर्ष 14 जाने. 1994 रोजी झालेल्या नामविस्ताराने संपुष्टात आला. या लढ्याच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी बुधवारी भारतीय दलित पँथर अमरावती जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (इर्विन )चौक येथे या लढ्यात जे लढवे शहीद झाले त्यांना आदरांजली तथा नामांतर चळवळीत सहभागी होऊन आपल्या आयुष्याचे मोलाचे बलिदान केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर योद्धा म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधीतज्ञ डॉ. पी.एस . खडसे, प्रमुख अतिथी खासदार बळवंत वानखडे, पूज्य भन्ते बुद्धप्रिय, पँथर नेते प्रभाकर घोडेस्वार,लक्ष्मण मेश्राम, सुधाकर पाटील, दादासाहेब क्षीरसागर, विनोद भालेराव, जयंत गवई, काशिनाथ बनसोड साहेबराव गुडसुंदरे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून, नामविस्ताराच्या आंदोलनात ज्यांनी प्राणाची आहुती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूज्य भदंत बुद्धप्रिय यांनी केले.सूत्रसंचालन भारतीय दलित पँथर चे सचिव अजय रामटेके तर आभार पँथर चे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय दलित पँथरचे पँथर प्रविण पाटील जिल्हा प्रमुख, पँथर लक्ष्मण भाऊ मेश्राम, पँथर मनोज धुळेकर, पँथर नंदु भाऊ खडसे, पँथर पंकज रंगारी, पँथर सचिन मेश्राम, पँथर मंगेश ससाने, पँथर राजपाल इंगळे, पँथर धर्मेंद्र बागळे, पँथर रवि भाऊ शेंडे, पँथर शिवदास गायकवाड, पँथर नागेश पाटील, पँथर प्रशांत रामटेके, पँथर मनोज कांबळे, पँथर अरुण चव्हाण, पँथर अरुण वासनिक, पँथर विजय बनसोड, पँथर शिवसागर पानतावणे, पँथर अंकित मेश्राम, पँथर सुधाकर पाटील, पँथर राजु शेंडे, पँथर सुनिल कापसेकर यांनी परिश्रम केले.




