अमरावतीत ऑपरेशन ‘वाइप आऊट’ अंतर्गत मॅरेथॉन

तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

-‘ड्रग्स फ्री सिटी’चे आवाहन
-अमरावती पोलिसांची जनजागृती मोहीम
अमरावती / 17 ऑगस्ट : अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तसेच ऑपरेशन वाइप आऊट या उपक्रमाअंतर्गत अमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आज (दि. 17 ऑगस्ट) भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा सकाळी 7 वाजता सुरू होऊन 8.30 वाजता यशस्वीरीत्या संपन्न झाली. यात शहरातील सुमारे 300 ते 400 युवक-युवतींसह व्यावसायिक मॅरेथॉन धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत प्रभावी जनजागृती घडून आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी स्पर्धकांचे स्वागत केले. मॅरेथॉनसाठी देण्यात आलेल्या टी-शर्टवरील जनजागृतीपर संदेशाने सर्वांचे लक्ष वेधले. या प्रसंगी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 शाम घुगे, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी-अंमलदार तसेच महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेची सांगता पोलीस बँडच्या वतीने राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली. यावेळी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार मानले. यापुढे देखील अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अशाच जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांचा त्यात सक्रीय सहभाग मिळावा, असे आवाहन करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button