एमआयडीसी परिसरात प्लॉस्टिकविरोधात मोठी कारवाई
394 पोती प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक जप्त; सुमारे 25 लाखांचा साठा उध्वस्त

अमरावती /31 डिसेंबर : शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने मा. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या ठोस व कठोर निर्देशांनुसार अमरावती महानगरपालिकेच्या वतीने चखऊउ परिसरात प्रतिबंधात्मक प्लॅस्टिकविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एका गोडाऊनमधून 394 पोती प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून त्याचे एकूण वजन 11,820 किलो आहे.
जप्त करण्यात आलेल्या प्लॅस्टिकची अंदाजे किंमत रु. 25,00,000/- (पंचवीस लाख रुपये) इतकी आहे. सदर ठिकाणी पंचनामा करून प्लॅस्टिक बंदी नियमांनुसार संबंधितावर रु. 5,000/- दंड आकारण्यात आला. ही कारवाई दि. 29 डिसेंबर रोजी रात्री 12.30 वाजेपर्यंत सुरू होती. मा. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक साठवणूक व वापर करणार्यांमध्ये मोठा इशारा मिळाला असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईवेळी प्लॅस्टिक कारवाई नोडल अधिकारी श्री. विनोद टांक, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक श्री. सचिन सैनी, अतिक्रमण प्रमुख श्री. योगेश कोल्हे, बिटप्युन श्री. नरेंद्र दुगलज तसेच अतिक्रमण विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन मा. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.




