नेत्यांच्या अनिल अग्रवाल यांंंना शुभेच्छा

अमरावती : जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते, खासदार, आमदार, माजी पालकमंत्री आणि इतर अनेक मान्यवर दैनिक अमरावती मंडल व दैनिक आपली मातृभूमिचे संपादक अनिल अग्रवाल यांना वाढदिवसानिमित्त अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात. यावेळी खा.बळवंत वानखडे, आ.सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते यश खोडके, माजी पालकमंत्री आणि भाजप नेते प्रवीण पोटे पाटील, श्रेयस दादा पोटे पाटील, प्रा. प्रकाश पुंड, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आदींचा सहभाग होता. दिवसभर, सँड अँड स्टोन कार्यालयात अनिल अग्रवाल यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी फुलांचे गुच्छ, शाल, श्रीफळ आणि मिठाई घेऊन गर्दी सुरू होती.




