भीमटेकडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

बौद्ध उपासक संघाचे आयोजन

अमरावती /4 जानेवारी : बौद्ध उपासक संघ भीम टेकडी परिसर अमरावती च्या वतीने दिनांक 03 जानेवारी 2026 रोज शनिवार ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ भीम टेकडी परिसर सायंकाळी 06-30 वा.आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. वर्षाताई गाडगे, प्रमुख उपस्थिती आयु. पुष्पाताई दंदे,आयु. अस्मिताताई सोमकुवर,आयु. उज्वला रामटेके, आयु. सोनडवले ताई,आयु. अस्मिता रोडगे,नलीनीताई नागदिवे विचारमंच वर विराजमान होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अतिथी च्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले नंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. पुष्पाताई दंदे यांनी सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला,आयु. अस्मिता सोमकुवर यांनी कवितेतून सावित्रीबाईं फुले यांचे विचार मांडले.आयु. उज्वला रामटेके यांनी थोडक्यात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले.आयु. सुनंदा डवले यांनी सावित्रीबाई फुले वरील कविता सादर केली.आयु. अस्मिता रोडगे यांनी थोडक्यात सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा सांगितला.आयु. सुनिता रायबोले यांनी ज्योतिरावाच्या कृपेने सार कळायला लागलं हे गीत सादर केले.आयु. अन्नपूर्णा बाई खाकसे यांनी स्वयं प्रेरणेने सावित्रीबाईंच्या धाडसी वृत्तीबाबत कवितेतून सांगितले.आयु. सविता भगत, आयु. भारती गुडदे, दिपक डांगे, प्रभाकर गाडगे यांनी गीत सादर केले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले. अध्यक्षीय मार्गदर्शनातून वर्षाताई गाडगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मापासून तर त्यांनी केलेला संघर्षाने प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका या पदापर्यंत पोहोचण्यासाठी ज्योतीरावांच्या साथीने शक्य झाले.

संबंधित बातम्या

Back to top button