कल्याण नगर चौकातून भव्य कावड यात्रा

अमरावतीत दुमदुमला ‘हर हर महादेव’चा गजर!

आ.रवी राणांची यात्रेला विशेष उपस्थिती

अमरावती /21 ऑगस्ट- श्रावणाच्या पावन पर्वावर अमरावती शहर भक्तिरसात पार न्हाऊन निघाले. कल्याण नगर चौकातील ’शिवशक्ती धाम मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कावड यात्रेने संपूर्ण परिसरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण केले. सात पवित्र तीर्थक्षेत्रांहून आणलेल्या जळाने सजवलेल्या कावडी खांद्यावर घेऊन हजारो शिवभक्त या यात्रेत सहभागी झाले होते.
’हर हर महादेव’ आणि ’जय भोलेनाथ’च्या अखंड जयघोषाने अवघी अमरावती नगरी दुमदुमून गेली होती. महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार श्री. रवीभाऊ राणा यांनी या सोहळ्याला खास उपस्थिती लावून कावडधार्‍यांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रसंगी त्यांनी प्रत्यक्ष कावडधार्‍यांशी आपुलकीचा संवाद साधत भगवान महादेवांचे दर्शन व आशीर्वाद घेतले. श्रावणातील ही कावड यात्रा म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नसून, ती आपली अढळ श्रद्धा आणि भक्तीचे जिवंत प्रतीक आहे. या भक्तिमय वातावरणातून समाजात एकता, बंधुभाव आणि सकारात्मक ऊर्जेचा नवा संचार व्हावा, अशी भावना आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली. या सोहळ्यास श्री महाकाली माता शक्तिपीठाचे पीठाधीश श्री शक्ती महाराज, शिक्षण सभापती ड. प्रीती रेवने यांच्यासह कुणाल गुप्ता, दिनेश गुप्ता, महेश गुप्ता, आदर्श गुप्ता, कैलास गुप्ता, कळदीन गुप्ता, अमित गुप्ता, सुधीर गुप्ता, मोहन यादव, सुधीर धुमटकर, सुभाष गुप्ता, विजय गुप्ता, गणेश यादव, गणेश गुप्ता, संजय गुप्ता, पप्पू गुप्ता, श्रीराम देशपांडे, प्रमोद कौशल, शंकर मालवीय, आनंद गुप्ता, शुभम गुप्ता, राकेश गुप्ता, दिनेश गुप्ता, प्रतिभा गुप्ता, अरुणा गुप्ता, उषाताई गुप्ता आणि शिवशक्ती धाम मित्र मंडळाचे सर्व आयोजक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button