इस्कॉन अमरावतीतर्फे गीता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

16 ते 18 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन

अमरावती /9 जानेवारी : राठी नगर स्थित सरस्वती कॉलनी येथील श्री श्री रुक्मिणी आध्यात्मिक संस्कार केंद्र (इस्कॉन) अमरावती तर्फे विविध कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांचा उद्देश जनमानसात आणि समाजात अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार प्रसार करणे, जीवनातील मूल्यांचे असंतुलन रोखण्यासाठी आणि जगामध्ये खरी एकता आणि शांती प्राप्तीसाठी सर्व लोकांना अध्यात्मिक जीवनात तंत्रशिक्षित करणे, समाजातील सदस्यांना एकत्र करून मानवतेचा विकास करणे, समाजामध्ये संकीर्तन चळवळ शिकवून एकत्रितरित्या कृष्ण नामाचा सामूहिक जप करणे हे होय. या सर्व उद्देशांना अनु सरून इस्कॉन संस्थापक आचार्य ए. सी. भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद यांचे वरिष्ठ शिष्य, इस्कॉन पदयात्रा मिनिस्टर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाद्वारे जीवन गौरव सन्मानाने पुरस्कृत, विश्वविख्यात कीर्तन सम्राट, त्रीदंडी संन्यासी परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्ग दर्शना खाली आणि प्रेरणेने गीता जागृती कार्य क्रमाचे आयो जन करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय गीता जागृती कार्यक्रम श्री जलाराम सत्संग मंडळ, अमरावती यांच्या सहकार्याने शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026 ते सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026 या कालावधीत श्री भक्तिधाम, बडनेरा रोड, साई नगर, अमरावती येथे संपन्न होणार आहे. तसेच गार्डन सिटी परिवार यांच्या सहकार्याने शुक्रवार, दिनांक 16 जानेवारी 2026 ते रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 या कालावधीत श्रद्धा कॉलनी, गार्डन सिटी, महार्षी कॉलेजजवळ, नवसारी रोड, अमरावती येथेही तीन दिवसीय गीता जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्रीदंडी संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांचे वरिष्ठ शिष्य, सुप्रसिद्ध कथा व्यास, विश्वप्रसिद्ध गीता-भागवत प्रशिक्षक तसेच अमरावती जिल्हा झोनल सुपरवायझर श्रीमान अनंतशेष प्रभुजी यांच्या सुमधुर वाणीतून गीता जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इस्कॉनतर्फे आयोजित गीता जागृती कार्यक्रमामुळे समाजात अध्यात्मिक व नैतिक मूल्यांचा जागर होणार असून, भगवद्गीतेच्या उपदेशांद्वारे जीवनाला योग्य दिशा मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button