महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात

युवा स्वाभिमान पार्टीच्या राजापेठ येथील

* 154 इच्छुक उमेदवारांच्या निवडणुक मुलाखत समितीकडुन घेण्यात आल्या मुलाखती

* इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्याची प्रचंड गर्दी

अमरावती /20 डिसेंबर : युवा स्वाभिमान पार्टीच्या राजापेठ येथील मुख्य कार्यालयात येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रियेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. या आज दि.19 डिसेंबर हा दुसरा दिवस असून तब्बल 154 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निवडणूक मुलाखत समितीकडून घेण्यात आल्या.
या मुलाखतींमध्ये उमेदवारांचा सामाजिक कार्याचा अनुभव, पक्षनिष्ठा, जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण तसेच निवडणूक जिंकण्याची क्षमता या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे. या मुलाखती राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यावेळी मार्गदर्शक म्हणून सुनीलजी राणा, तसेच समिती सदस्य प्रा. अजयजी गाडे, नंदेशजी अंबाडकर, शैलेंद्रजी कस्तुरे, जयंतराव वानखडे, हरिषजी चरपे, कमलकिशोरजी मालानी, शिवदासजी घुले, संजय हिंगासपुरे, सोनाली नवले, ज्योती सैरिसे, संजय मुनोत, मनोज चांदवानी, प्रा. सतीश खोडे, प्रा. संतोष बनसोड, गंगाधर आवारे आणि बाळु इंगोले, अवी काळे उपस्थित होते. पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहून काम करणार्‍या आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणार्‍या उमेदवारांना संधी देण्याचा मानस पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला. येत्या काही दिवसांत उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टी भक्कम ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत या प्रक्रियेतून स्पष्ट होत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button