पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
महिला सशक्तीकरण, आरोग्य व सुरक्षिततेबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन

अमरावती /12 मार्च : पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, अमरावती येथे 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीप्ती बी. रुईकर मॅडम, प्राध्यापकवर्ग, महिला प्राध्यापक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक विजया पंधारे उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करताना महिलांनी कायद्याची माहिती ठेवणे, आत्मविश्वासाने वागणे तसेच कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे किती महत्त्वाचे आहे यावर भर दिला. यानंतर डॉ. शरयू वानखेडे यांनी महिलांमध्ये आढळणार्या पीसीओडी या सामान्य आरोग्य समस्येबाबत सविस्तर माहिती दिली.




