स्वदेशी उत्पादकता बचत गटांचे भविष्य तारणार

माजी खा.रामदासजी तडस यांचे प्रतिपादन

* सांसद स्वदेशी मेळाव्याचा समारोप

वरुड । 13 ऑक्टोबर – गेल्या तीन दिवसांपासून, म्हणजे 10 ते 12 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संत्रा लिलाव मंडी कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड येथे सांसद स्वदेशी मेळाव्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. आज या मेळाव्याचा समारोप व गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी खासदार रामदासजी तडस होते. तीन दिवसांच्या स्वदेशी मेळाव्यामध्ये वरुड तालुका, मोर्शी तालुका तसेच संपूर्ण अमरावती जिल्हा आणि जिल्हा बाहेरील स्वदेशी उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या काळात स्वदेशी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. प्रदर्शनात अनेक महिला बचत गटांनी गृह उपयोगी नवीन वस्तू व नवनिर्मितीच्या संकल्पना सादर केल्या. विशेषतः तळागाळातील बचत गटांनी आपल्या आर्थिक विकासाचा मार्ग खुला करणार्‍या विविध खाद्यपदार्थांसह सहभागी होऊन सांस्कृतिक व परंपरागत उत्पादनांचे प्रदर्शन केले. समारोप कार्यक्रमात अनेक बचत गटांनी प्रकल्प संयोजक विक्रम ठाकरे यांनी उपलब्ध करून दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, काही बचत गटांनी आपल्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार करण्याची संधी देखील मिळवली. प्रदर्शनीमध्ये खाद्यपदार्थांपासून ते उन्हाळी गृह उपयोगी वस्तू, विविध आयुर्वेदिक औषधे आणि दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या अनेक वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. माजी खासदार रामदासजी तडस यांनी भाषणात सांगितले की, स्वदेशी उत्पादकता बचत गटांचे भविष्य तारणार आहे, तर विक्रम ठाकरे यांनी ग्रामीण अर्थचक्र सुधारण्याची संधी म्हणजे स्वदेशी उत्पादकता असल्याचे स्पष्ट केले. समारोप सोहळ्यास माजी खासदार रामदास तडस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्ञानेेशर दाभाडे, प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. मनोहर आंडे, बाळूभाऊ मुरूमकर, अमित कुबडे, माजी न.प. उपाध्यक्ष विशाल सावरकर, भाजपा माजी शहराध्यक्ष निलेश फुटाणे, भाग्येश देशमुख, माजी अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, विजय यावले, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, प्रतिभा महल्ले, विद्या भुंबर, माजी शहराध्यक्ष माधुरी भगत, अर्चना खांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र उर्फ बबलू पावडे, उपसभापती बाबाराव मांगुळकर, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तुषार निकम, सचिव राहुल चौधरी, माजी सरपंच सुधाकर दोड, उल्हासराव लेकुरवाळे, प्रवीण कुबडे, जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष नितीन खेरडे, माजी नगरसेवक नलिनी रक्षे, प्रथमेश महांगडे, उमेश कांडलकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी देखील या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

संबंधित बातम्या

Back to top button