अत्याधुनिक सुक्ष्मजीवशास्त्र संग्रहालयाचे उद्घाटन

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे

अमरावती/27 फेब्रुवारी : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागात डिजीटल संग्रहालयाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी प्र. देशमुख यांच्या शुभहस्ते व संस्थेचे पदाधिकारी अ‍ॅड. गजाननराव पुंडकर, अ‍ॅड. जयवंत उपाख्य भैय्यासाहेब पाटील (पुसदेकर), श्री केशवराव मेतकर, श्री दिलीपबाबू इंगोले, श्री सुरेशराव खोटरे, प्रा. सुभाषराव बनसोड, संस्थेचे आजीवन सभासद तथा स्वतंत्र विकास समितीचे सदस्य डॉ. प्रभाकरराव काळमेघ, डॉ. विरेंद्र वसु, डॉ. विजयराव बोंडे, डॉ. निळकंठ यावलकर, अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, विभाग प्रमुख डॉ. प्रमोद भिसे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवन टेकाडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोहोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाले. वैद्यकीय शिक्षण अधिक प्रभावी व प्रात्यक्षिकाधिष्ठित व्हावे या उद्देशाने महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात डिजीटल सुक्ष्मजीवशास्त्र संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे. या संग्रहालयामध्ये जीवाणूशास्त्र, विषाणूशास्त्र, पॅरासीटॉलॉजी, मायक्रोलॉजी, इम्युनॉलॉजी, मॉलिक्युलर मायक्रोबायोलॉजी या विषयांशी संबधित संरक्षित नमुने, विविध मॉडेल्स, चार्ट्स, छायाचित्रे, कल्चर प्लेटस्, रंगीकरण स्टेनिंग पध्दती तसेच दृक-श्राव्य साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेषतः रूग्णांमध्ये आढळणा-या महत्वाच्या सूक्ष्मजीवांचे निदान व प्रयोगशाळा तंत्रज्ञान यावर भर देण्यात आला आहे. हे संग्रहालय पदवी व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अध्ययन केंद्र ठरणार असून, विद्यार्थ्यांना विषयाचे दृश्यात्मक व प्रत्यक्षज्ञान मिळण्यास मदत होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button