अल्पवयीन युवतीच्या फायदा घेत लादले मातृत्व
युवकाविरुध्द गुन्हा दाखल

वरुड । 19 नोव्हेंबर – अल्पवयीन युवतीच्या अज्ञा नाचा फायदा घेत तिला मातृत्व लादल्याप्रकरणी शह रातील मिरची प्लॉट परिसरातील एका युवकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार ग्रामीण रुग्णालय येथुन मेमो पोलिस स्टेशन ला प्राप्त झाले वरुन यातील अल्पवयीन पिडीतीचे बयान घेतले असता सदर अल्पवयीन पिडीत हिने तिचे बयानात सांगितले की, 1 जुन 2024 ते 23 एप्रिल 2025 दरम्यान आरोपी लखन सुखदेव उईके (24) यांचे सोबत प्रेमसंबंध असुन यातील आरोपी हा फिर्यादी हिला पत्नीसारखा वागवु लागला, त्या दरम्यान आरोपीे लखन उईके हिने फिर्यादी सोबत वारंवार शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याने सदर अल्पवयीन पिडीत मुलगी ही गरोदर असुन ती गेल्या 17 नोव्हेंबर2025 रोजी पोट दुखण्याचा त्रास होत असल्यामुळे ती ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. फिर्यादी अल्पवयीन युवतीच्या बयानावरुन आरोपी लखन सुखदेव उईके विरुध्द कलम 64 (1), 64 (2), (उ), भा.न्या.सं.सहकलम 4, 6 बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन पोलिस वरुड पोलिस करीत आहेत.




